Akash Deep Debut: टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील चौथ्या कसोटी (4th Test Match) सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. रांची (Ranchi Test) येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून आकाश दीपला (Akash Deep) भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आकाश दिपला (Aakash Deep) डेब्यू कॅप दिली. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज आकाश दीपचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. जसप्रीत बुमराहला रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. 


याआधी राजकोट येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं. आता रांची कसोटीत आकाश दीपचं नशीब उघडलं. टीम इंडियाकडून कसोटी खेळणारा आकाश हा 313 वा खेळाडू ठरला आहे.


आकाश दीपनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय क्रिकेट कसोटी संघात स्थान मिळवलं. बंगालकडून प्रथम श्रेणी खेळणाऱ्या आकाश दीपनं रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये चमकदार कामगिरी केली. तो शेवटचा रणजी सामना केरळविरुद्ध खेळला, ज्यात त्यानं 1 विकेट घेतला. यापूर्वी आकाश टीम इंडियाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना दिसला होता. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2 विकेट्स घेतले होते. यानंतर त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 6 तर तिसऱ्या सामन्यात 5 विकेट घेतले.


रांची कसोटीत बुमराहच्या जागी आकाश दीप 


रांची कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहला विश्रांती दिल्यानंतर त्याच्या ऐवजी टीम इंडियात कोण खेळणार असा प्रश्न कायम होता. अशातच केएल राहुल अनफिट असल्यामुळे चौथ्या कसोटीत खेळणार नाही. तसेच, टीम इंडियाचं रन मशीन असलेल्या विराट कोहलीनं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. अशातच टीम इंडियांच्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत प्लेईंग 11 ठरवणं तसं फार अवघड होतं. अशातच बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची जागा भरणं रोहित आणि निवड समितीसमोर मोठं आव्हान होतं. अशातच बुमराहच्या अनुपस्थितीत जागा घेण्यासाठी संघ व्यवस्थापनानं आकाश दीपवर विश्वास दाखवला आहे. 


आकाश दीपला संधी 


इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोण खेळणार? हा प्रश्न सध्या बीसीसीआयसमोर होता. पण बीसीसीआयला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि ते उत्तर म्हणजे, आकाश दीप. मूळचा बिहारचा असलेला वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेणार आहे. अलीकडेच त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या. 


27 वर्षीय आकाश दीपनं त्याच्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 104 विकेट्स आहेत. त्याची सरासरी 23.58 आहे. एवढंच नाही तर आकाश दीप आयपीएलही खेळला आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.


इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत युवा खेळाडूंचं पदार्पण 


याआधी रजत पाटीदारनं दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं, तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं. आता आकाश दीपनं चौथ्या कसोटीत पदार्पण केलं आहे.


टीम इंडियाची प्लेईंग 11


यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज


इंग्लंडची प्लेईंग 11


जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


रांची कसोटीत इंग्लंडची फलंदाजी, टीम इंडियात एक मोठा बदल; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11