India Playing 11 Vs England, 4th Test Match: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना (4th Test Series) आजपासून (23 फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धचा टीम इंडियाचा आजचा सामना रांचीच्या जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.
टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल कन्फर्म!
रांची कसोटीत टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहेत. इंग्लंडनं एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली असून इंग्लंडनं प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या जागी ऑली रॉबिन्सनला संधी देण्यात आली आहे. याशिवाय रेहान अहमदच्या रूपानं फिरकी विभागातही बदल करण्यात आला आहे. रेहानच्या जागी शोएब बशीरचा समावेश करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराहच्या रूपानं भारतीय संघात एक बदल होणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला चौथ्या कसोटीच्या संघातून मुक्त करण्यात आलं असून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मुकेश कुमार आणि आकाश दीप यांच्यापैकी एक खेळाडू सिराजसोबत इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवताना दिसणार आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. टीम इंडिया चार स्पिनर्स आणि एक पेसरसह मैदानात उतरू शकते.
वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलच्या नावाचीही चर्चा
रजत पाटीदारला आणखी एक संधी देऊ शकते. पाटीदारला 4 डावात 11.5 च्या सरासरीनं केवळ 46 धावा करता आल्या. एकूणच भारताच्या प्लेईंग-11 मध्ये एकच बदल होणार आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर रांचीच्या खेळपट्टीचं स्वरूप लक्षात घेता संघात दोन वेगवान गोलंदाज आणि तीन स्पिनर्सचा समावेश करणं योग्य ठरू शकतं. पण भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनी खेळपट्टीवर भेगा असल्यामुळे चेंडू अधिक वळण घेईल असं म्हटलं आहे. त्यामुळे टीम इंडियात वेगवान गोलंदाजापेक्षा आणखी एका स्पिनरला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आर अश्विन आणि जाडेजाच्या जोडीला तिसरा स्पिनर खेळताना दिसू शकतो. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची संभाव्या प्लेईंग 11
टीम इंडियाची प्लेईंग 11
यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मुकेश कुमार/आकाश दीप, मोहम्मद सिराज.
टीम इंग्लंडची प्लेईंग 11
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन.
महत्त्वाच्या इतर बातम्या :