Baroda vs Mumbai Semi Final-1 Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टूर्नामेंट 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याचा सामना मुंबईशी झाला. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेची तुफानी खेळी आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. रहाणेला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारा दुसरा संघ कोण असेल, यावरून अद्याप पडदा उठलेला नाही.  


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. शिवालिक शर्माने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या, तो 36 धावांवर नाबाद परतला. संघाने केवळ 158 धावा केल्या. कर्णधार कृणाल पंड्याने 30 धावा केल्या, तर हार्दिक पंड्या केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईकडे पाठलाग करण्यासाठी मोठी धावसंख्या नव्हती, पण पृथ्वी शॉच्या रूपाने त्याची पहिली विकेटही लवकर पडली. त्याला केवळ 8 धावा करता आल्या. मात्र, दुसऱ्या टोकाला अजिंक्य रहाणेने तूफानी फटकेबाजी सुरू ठेवली.


अजिंक्य रहाणे 98 धावा झाला आऊट


मुंबईच्या या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला अजिंक्य रहाणे. त्याला आपले शतक पूर्ण करता आले नसेल, तरी आपल्या संघाला विजयाच्या दारात घेऊन गेल्यानंतर तो बाद झाला. त्याने 56 चेंडूत 98 धावांची तुफानी खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि तीन षटकार आले. संघाला विजयासाठी दहा धावा करायच्या होत्या तेव्हा रहाणे 90 धावांवर खेळत होता. त्याने दोन चौकार मारून आपली धावसंख्या 98 वर नेली. आता संघाला विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि रहाणेला त्याच्या शतकासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. दरम्यान अभिमन्यू सिंगने वाईड बॉल टाकला.


अजिंक्य रहाणेला शतकासाठी दोन धावांची गरज होती, पण मुंबईला विजयासाठी एका धावेची गरज होती. म्हणजे रहाणेने चौकार किंवा षटकार मारला असता तरच त्याचे शतक पूर्ण झाले असते. रहाणेने हाच प्रयत्न केला. पण चेंडू तो बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही त्याच धावसंख्येवर बाद झाला. त्याने सात चेंडूत एक धाव घेतली. विजयासाठी केवळ एका धावेची गरज असली तरी त्यामुळे मुंबईला फारशी अडचण आली नाही आणि संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला.


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीत रोहित शर्मा गंभीरच्या लाडक्याचा करणार गेम? टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये 'या' खेळाडूची थेट एन्ट्री