गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल होत आहेत. अलीकडेच जेसन गिलेस्पीने पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आकिब जावेद यांना नवे अंतरिम प्रशिक्षक बनवले आहे. इतके बदल करूनही पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याने पाकिस्तान क्रिकेटची सतत खिल्ली उडवली जात आहे. खुद्द माजी क्रिकेटपटूही रोज आपल्या संघावर प्रश्न उपस्थित करत असतात.


4 वर्षात बदलले 6 कोच


जेसन गिलेस्पीने यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने पाकिस्तान संघाशी 2 वर्षांचा करार केला होता, तरी ज्यानंतर त्यांना लवकरच प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागले. त्याआधी गॅरी कर्स्टन संघाचे प्रशिक्षक होते. 4 वर्षात आतापर्यंत पाकिस्तान संघाचे 6 प्रशिक्षक बदलण्यात आले आहेत. असे असूनही संघाच्या कामगिरीत सुधारणा होत नाही.  


पीसीबीच्या निर्णयावर गिलेस्पी संतापला  


ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, जेसन गिलेस्पी पाकिस्तानच्या रेड बॉल संघाचे हाय परफॉर्मन्स कोच टिम निल्सन यांचा करार न वाढवल्यामुळे पीसीबीवर नाराज होता. या निर्णयाबाबत गिलेस्पीला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी प्रशिक्षकपदाचा राजीनामा पाकिस्तान संघाला महागात पडू शकतो. पाकिस्तान संघाच्या दुसऱ्या प्रशिक्षकाने 7 महिन्यांत राजीनामा दिला आहे.






दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवली जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊन येथील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. पाकिस्तानचा पुरूष संघ सध्या तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. 






पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. नवे प्रशिक्षक आकीब जावेद या कसोटी मालिकेपासून त्यांचा कार्यकाळ सुरू करणार आहेत. ज्यांच्यावर संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून देण्याचेही दडपण असेल.


हे ही वाचा -


Vinod Kambli : कपिल देव यांनी साद घालताच विनोद कांबळीने स्वीकारली ऑफर; सचिन अन् स्वत:च्या आजारपणावरही केला खुलासा