Afghanistan Team Celebration : विश्वचषकात अफगाणिस्तान संघाने दुसरा उलटफेर केला. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा आठ विकेटने लाजीरवाणा पराभव केला. याआधी गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला होता. अफगाणिस्तान संघाने या विजयासह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तान संघाने दहाव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. पाच सामन्यात चार गुणांसह अफगाणिस्तान संघाने दोन उलटफेर केले. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अफगाणिस्तान संघासोबत इरफान पठाणही थिरकला. त्याशिवाय ड्रेसिंग रुममध्ये अजय जाडेजानेही डान्स केला. 


पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अफगाण खेळाडू थिरकले -


पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष साजरा केला. याशिवाय स्टेडियमणधील अफगाणिस्तानच्या चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारल्या. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी विजयानंतर चेन्नईच्या मैदानाला फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने राशिद खानसोबत हा विजय साजरा केला, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याशिवाय ड्रेसिंगरुममध्ये अजय जाडेजा याने अफगाण खेळाडूसोबत जल्लोष केला. 


 






















पाकिस्तानचा तिसरा पराभव - 


आज पाकिस्तानचा लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे.  पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचे सामना शिल्लक आहेत. पाकिस्तान संघाला नेदरलँड आणि श्रीलंकाविरोधात विजय मिळवता आला. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकाराला आहे.