Shoaib Akhtar on ICC Champions Trophy 2025 Hybrid Model : आयसीसीच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून गदारोळ सुरू आहे. बीसीसीआयने संघ पाकिस्तानला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेलच्या बाजूने नाही. हायब्रीड मॉडेल न स्वीकारल्यास त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आयसीसीने पाकिस्तानला दिला आहे.
वृत्तानुसार, पीसीबी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पीसीबीची इच्छा आहे की जर चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली गेली तर 2031 पर्यंत भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टूर्नामेंट देखील त्याच हायब्रीड मॉडेलनुसार खेळल्या जाव्यात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने पीसीबीचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तान पाहिजे तितके खोटे पसरवू शकतो, पण शोएब अख्तरने मोठा खुलासा केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल शोएब अख्तर काय म्हणाला?
चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुद्दा सध्या क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चेत आहे. जिकडे पाहावे तिकडे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत-पाकिस्तानचीच चर्चा आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तानी चॅनलवर बसलेला आहे. पीसीबी गेल्या अनेक दिवसांपासून हायब्रीड मॉडेल न स्वीकारण्यावर ठाम आहे, मात्र शोएब अख्तरने हायब्रीड मॉडेलचा करार आधीच केल्याचा दावा केला आहे. शोएब अख्तरसोबत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि पाकिस्तान संघाचा क्रिकेट संचालक मोहम्मद हाफीजही पॅनेलमध्ये बसला होता.
पीसीबी प्रमुखांनीही दर्शवली हायब्रीड मॉडेलला सहमती
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात मीडिया आणि सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांचे विधान समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलची कल्पना जवळपास स्वीकारली आहे. PCB प्रमुख मोहसीन नक्वी यांनी काल दुबईत 2024 अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर मीडियाशी संवाद साधला आणि त्यादरम्यान ते चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल खुलेपणाने बोलताना दिसले. यादरम्यान मोहसीन नक्वी यांना हायब्रीड मॉडेलचा अवलंब करणार का असे विचारले असता, क्रिकेटच्या भल्यासाठी जो काही निर्णय घेतला जाईल तो घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा -