India vs West Indies, Heah to Head Record : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. क्विन्स पार्क ओव्हल मैदानात खेळवला जाणारा हा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेऊ शकतो. दुसरीकडे वेस्ट इंडीज सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधू शकतो. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात पहिल्या सामन्यात 300 धावांहून अधिक धावा दोन्ही संघानी केल्या, त्यामुळे आजही एक चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. तर अशा या चुरशीच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहूया...
भारत- वेस्ट इंडीज हेड टू हेड रेकॉर्ड
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत तब्बल 137 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं वेस्ट इंडीजसमोर जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 68 सामने जिंकले आहेत. तर, 63 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. याशिवाय, चार सामने अनिर्णित आणि दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. अजून दोन सामने मालिकेतील शिल्लक आहेत.
संभाव्य भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI, Pitch Report : आज रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?
- ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!