India vs West Indies 2nd ODI, Playing XI: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज सायंकाळी सात वाजता एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असल्याने आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेऊ शकतो. अशामध्ये या महत्त्वाच्या सामन्यात भारत नेमके आपले कोणते 11 खेळाडू खेळवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पहिल्या सामन्यात भारत केवळ 3 धावांनी विजयी झाला होता, अत्यंत चुरशीचा सामना यावेळी पाहायला मिळाला. त्यामुळे आज मात्र एक दमदार खेळ दाखवून सामना मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी टीण इंडिया सज्ज झाली आहे.


अशामध्ये अंतिम 11 खेळाडूंचा विचार करता या दौऱ्यामध्ये प्रथमच भारतीय एकदिवसीय संघात एन्ट्री मिळालेला युवा गोलंदाज अर्शदीप सिंह मैदानात उतरु शकतो. त्यामुळे आज त्याचा टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यात डेब्यू होऊ शकतो. याशिवाय आवेश खानला पण आज संधी मिळू शकते. या दोघांपैकी एकजण अक्षर पटेलच्या जागी खेळू शकतो. कारण पहिल्या सामन्यात लेफ्ट आर्म स्पिन ऑलराउंडर अक्षर पटेल हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे सामना सुरु असतानाच बाहेर पडला होता. अशात तो आजचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. तर नेमकी अंतिम 11 कशी असू शकते हे पाहूया...


भारताची संभाव्य अंतिम 11 - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह/आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-