Aakash Chopra about IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून माजी क्रिकेटर आणि कॉमेंटीटर आकाश चोप्रा यानेही मुकेशच्या गोलंजदाजीचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने मुकेशला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी तयार केलं आहे. चौधरीने आयपीएलच्या एका सामन्यातील चार षटकात 46 रन देत चार विकेट्सही घेतले. एकूण 13 सामन्यात 16 विकेट्स मिळवल्या आहेत.
चौधरीचं कौतुक करताना चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, "यंदा नव्या चेंडूने कोणी सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी केली असेल तर तो मुकेश चौधरी आहे. त्याला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं त्याच्या या कामगिरीने इतरांवर चांगलाच दबाव बनावला. धोनीने यासाठी त्याला खास ट्रेन केलं."
लखनौविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण
मुकेश चौधरी गेल्या वर्षी चेन्नईच्या संघात सामील झाला होता. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. तो नेट बॉलर म्हणून संघात होता. परंतु, चेन्नईचा गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळं बाहेर गेल्यानं संघ व्यवस्थापनानं मुकेश चौधरीला लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली. आज मुंबईविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्यानं उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे.
मु्केश चौधरीची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी
मुकेश चौधरीनं सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो लोकांच्या नजरेत आला होता. मुकेश चौधरी हा राजस्थानच्या भिलवाडा येथील रहिवासी आहे. तो अनेक संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. विशेष म्हणजे, मुकेश चौधरीला चेन्नईच्या संघानं त्याची मूळ किंमत 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.
हे देखील वाचा-