IND vs AUS, 2nd Test : सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्यातील पहिल्या सत्रादरम्यान भारतीय संघाचा एक फॅन भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी थेट मैदानात पोहोचला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर सीमारेषेवर उभ्या असलेल्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) गार्डला मारहाण करण्यापासून रोखलं आणि संबधित चाहत्याला बाहेर जाण्यास सांगितलं.
पाहा VIDEO-
146 वर्षांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाने उतरवला असा संघ
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कांगारू संघाने फिरकीपटूंवर अधिक भरवसा दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनवर नजर टाकली तर कांगारूंचा संघ केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. तो वेगवान गोलंदाज स्वतः कॅप्टन पॅट कमिन्स आहे. 146 वर्षांच्या कसोटी इतिहासात केवळ एकाच वेगवान गोलंदाजासह ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सलामीच्या सामन्यात भारताचा दमदार विजय
नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
दिल्लीच्या मैदानात भारताचा दमदा रेकॉर्ड
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
हे देखील वाचा-