IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीच्या मैदानावर खेळला जाणारा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) खूप खास ठरला आहे. भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये 100 कसोटी सामने खेळणारा तो 13वा भारतीय खेळाडू ठरला आहे. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळल्यानंतर पुजाराने स्वत:ला कसोटी संघातील एक महत्त्वाचा खेळाडू बनवलं. योगायोगाने तो आपला पहिला आणि 100 वा सामना कांगारुविरुद्धच खेळत आहे.


चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. 100 व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने त्याचं संपूर्ण कुटुंब देखील मैदानावर उपस्थित असून भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी सामना सुरू होण्यापूर्वी पुजाराला स्मृतिचिन्ह देऊन या ऐतिहासिक प्रसंगी त्याचं अभिनंदन केलं. यादरम्यान, अनेक माजी दिग्गज खेळाडूंशिवाय, सध्याच्या खेळाडूंनीही पुजाराचे सोशल मीडियाद्वारे त्याच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. चेतेश्वर पुजाराचे त्याच्या 100 व्या कसोटी सामन्याबद्दल अभिनंदन करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरने लिहिले की, पुजाराचे टीम इंडियासाठी 100 कसोटी सामने खेळल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. हा खूप खास क्षण आहे. तुम्ही देशासाठी तुमची सर्वोत्तम कामगिरी देत राहा. आयसीसीनंही खास फोटो पुजारासाठी पोस्ट केला आहे.






















पुजाराची कारकिर्द थोडक्यात


ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये टीम इंडियासाठी पदार्पण करणार्‍या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत करिअरमध्‍ये एकूण 99 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 169 डावात फलंदाजी करताना त्याने 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 धावा आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-