T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं नेदरलँड्सचा (IND vs NED) 56 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं नेदरलँड्ससमोर 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर भारतीय गोलंदाजीपुढं नेदरलँड्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.नेदरलँड्सचा संघ अवघ्या 123 धावांवर गारद झाला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. दरम्यान, नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) दोन मेडन ओव्हर टाकून खास विक्रमाला गवसणी घातलीय.


नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारनं चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात त्यानं तीन षटकात 9 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. ज्यात दोन मेडन ओव्हरचा समावेश आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं टी-20 क्रिकेटमध्ये दोन मेडन ओव्हर टाकले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. 


ट्वीट-






 


भुवनेश्वर कुमारची कारकिर्द
भुवनेश्वर कुमारनं आतापर्यंत एकूण 21 कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधत्व केलंय. ज्यात त्यानं 63 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, भारतासाठी खेळलेल्या 121 एकदिवसीय सामन्या त्यानं 35.11 च्या सरासरीनं 141 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची इकोनॉमी 5.08 इतकी आहे. तसेच 81 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 88 विकेट्सची नोंद आहे. टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यातही भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये दिसला. त्यानं चार षटकात 22 धावा खर्च करून एक विकेट्स मिळवली. त्यानं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं.


भारताचा सलग दुसरा विजय
नेदरलँड्सविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं 56 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 123 धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, राट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं ठोकली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडच्या संघाला अवघ्या 123 धावांवर रोखलं. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.


हे देखील वाचा-