T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 11व्या सामनात भारत आणि नेदरलँड्स एकमेकांशी भिडले. हा सामना भारतानं 56 धावांनी जिंकला. हा भारताचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्ध भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. नेदरलँड्सविरुद्ध विजयानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) 'आणखी एक दमदार विजय' अशा आशायाचं ट्वीट केलं. विराटच्या या ट्विटवर सूर्यानं 'SurVIR' असा रिप्लाय दिला. ज्यामुळं सोशल मीडियावर सूर्याच्या भन्नाट रिप्लायची चर्चा सुरू झालीय. 


रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्याची जबरदस्त खेळी
 नेदरलँड्सविरुद्ध नाणेफेक जिंकून मैदानात उतरलेल्या भारतीय संघ सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. दरम्यान, 10 षटकात भारताची धावसंख्या 67 धावांवर एक विकेट्स अशी होती. मात्र, त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं गिअर बदलला आणि भारताच्या धावसंख्येला गती दिली. रोहित आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि सूर्याकुमार यादवनं आक्रमक खेळी सुरू ठेवत भारताची धावसंख्या 20 षटकांत 179 वर पोहचवली. या सामन्यात रोहित शर्मानं 39 चेंडूत 53 धाव केल्या. तर, विराट कोहलीनं नाबाद 62 आणि सूर्यकुमार यादवनं नाबाद 51 धावांचं योगदान दिलं.


सूर्यकुमार यादवचा भन्नाट रिप्लाय-




विराट- सूर्याची आणखी एक जबरदस्त पार्टनरशिप
- हाँगकाँग विरुद्ध 42 चेंडूत 98 धावा
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध 62 चेंडूत 104 धावा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 42 चेंडूत 102 धावा
- नेदरलँड्सविरुद्ध 48 चेंडूत 95 धावा


नेदरलँड्सविरुद्ध भारताचा 56 धावांनी विजय
नेदरलँड्सविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं 56 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 123 धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, राट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं ठोकली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडच्या संघाला अवघ्या 123 धावांवर रोखलं. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.


हे देखील वाचा-