ICC T20 WC 2022, IND vs NED : भारत विरुद्ध नेदरलँड (IND vs NED) सामना नुकताच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. सामन्यात भारताने उत्तम फलंदाजी आणि नंतर दमदार गोलंदाजी करत 56 धावांनी विजय मिळवला आहे. भारतानं आधी फलंदाजी करत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर नेदरलँड संघाला 123 धावांत रोखलं, ज्यामुळे 56 धावांनी सामना भारताने जिंकला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं अर्धशतकं ठोकली असून गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. सलामीवीर म्हणाून सूर्यकुमार यादवला सन्मान केलं.

 

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने एक मोठी धावसंख्या उभारुन नेदरलँडवर प्रेशर आणायचा आणि त्यांना स्वस्तात सर्वबाद करुन मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा डाव आखला होता. विशेष म्हणजे यावर भारतीय संघ खराही उतरला. प्रथम फलंदाजीला आल्यावर भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहे. भारताच्या चार फलंदाजांनी आज फलंदाजी केली, ज्यातील राहुल केवळ स्वस्तात (9 धावा) करुन बाद झाला. त्याच्याशिवाय इतर तीनही फलंदाजांनी अर्धशतकं ठोकली. यामध्ये कर्णधार रोहितने 39 चेंडूत 53 धावा केल्या. तर विराटनं 44 चेंडूत नाबाद 62 आणि सूर्यकुमारनं 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. दोघांनी नाबाद 95 धावांची भागिदारीही उभारली. नेदरलँडकडून फ्रेड आणि वॅन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर 180 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँडवर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी प्रेशन कायम ठेवलं. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, तसंच विकेट घेणंही कायम ठेवलं. 20 षटकात 123 धावांवर नेदरलँडला भारतानं रोखलं यावेळी भारताकडून आर आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेकली. विशेष म्हणजे या विजयासह भारताच्या नावावर 4 गुण झाले असून नेट रनरेटही भारताचा +1.425 झाला आहे. म्हणून ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारत अव्वलस्थानी आहे. 

कसा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल?

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS
1 भारत 2 2 0 0 0 +1.425 4  
2 दक्षिण आफ्रीका 2 1 0 0 1 +5.200 3  
3 बांग्लादेश 2 1 1 0 0 -2.375 2  
4 झिम्बाब्वे 1 0 0 0 1 - 1  
5 पाकिस्तान 1 0 1 0 0 -0.050 0  
6 नेदरलँड 2 0 2 0 0 -1.625 0  

हे देखील वाचा-

SA vs BAN, T20 World Cup 2022 : आधी रोसोची स्फोटक खेळी, मग नॉर्खियाची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 104 धावांनी विजय