नवी दिल्ली : जगभरातील वाढता प्रकोप पाहता, अनेक खेळाडू आणि क्लब मदतीसाठी समोर आले आहेत. अशातच क्रिकेटर्स, अॅथलीट्स, हॉकी प्लेयर्स आणि फुटबॉल खेळाडूंचा समावेश आहे. आता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी धावून आला आहे. त्याने आपल्या पगारातील 377 कोटी रूपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे.


फक्त मेस्सीचं नाहीतर फुटबॉल विश्वातील अनेकजण कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. दरम्यान, मेस्सी बार्सिलोनाच्या खेळाडू वेतनातून 70 टक्के कपात करून आपला हातभार लावणार आहे. जेणेकरून क्लबच्या इतर कर्मचाऱ्यांना स्पेनमधील संकटकाळात त्यांचा पूर्ण पगार मिळेल. आपल्या इन्स्टाग्रामवरून मेस्सीने एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.



मेस्सीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिलं आहे की, 'आता एक महत्त्वाची घोषणा करण्याची वेळ आली आहे. आमच्याकडूनही देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी वेतनातील 70 टक्के कपात करण्यात येणार आहे. आम्हीही योगदान करणार आहोत, जेणेकरून क्लबमधील इतर कर्मचाऱ्यांना या कठिण परिस्थिती पूर्ण वेतन मिळेल. आणखी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की, आमची इच्छा होती की, आम्ही आमच्या वेतनाहील काही भाग द्यावा. कारण देशा फार कठीण परिस्थितीतून जात आहे. जेव्हाही आम्हाला मदतीसाठी विचारण्यात आलं, त्यावेळी आम्ही नेहमी क्लबची मदत केली आहे.


मेस्सीने पुढे बोलताना लिहिलं आहे की, 'सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, आमची परिक्षा घेण्यासाठी अनेक लोक आमच्यावर दबाव टाकत होते. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.' मेस्सीने ही पोस्ट करताच बार्सिलोनाच्या इतर खेळाडूंनीही त्याची साथ दिली आहे. त्यामध्ये गेरार्ड पिके, सर्गियो बास्केट, लुई सुआरेज, जोर्डी एल्बा, एंटोइन ग्रिजमान, फ्रेंकी डि जोंग, आर्टुरो विडाल आणि मार्क-आंद्रे टर स्टेगन यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून क्लबचे काही खेळाडू आणि क्लबच्या अधिकाऱ्यांमध्ये तणाव सुरू आहे.


दरम्यान, जगभरात आतापर्यंत साडेसात लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 35 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या :


coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत


Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत


Coronavirus | मुकेश अंबानी यांचं पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटींचं योगदान!

लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर