मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कोरोना व्हायरस या महामारीशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटी रुपयांचं योगदान देणार आहे. कंपनीने सोमवारी (30 मार्च) एका प्रसिद्धीपत्रकात याची माहिती दिली. याशिवाय कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये जमा करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, "भारत लवकरच कोरोना व्हायरसच्या संकटावर लवकरच मात करेल, याचा आम्हाला विश्वास आहे. या संकटसमयी रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम देशासोबत आहे आणि COVID-19 विरोधातील हे युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक सर्व मदत करेल."
रिलायन्सचा अॅक्शन प्लॅन
रिलायन्स इंडस्ट्रीजने एक आठवड्यापूर्वीच कोरोना व्हायरसविरुद्धच्या या लढाईत योगदान देण्यासाठी अॅक्शन प्लॅन जारी केला होता. या अॅक्शन प्लॅनमध्ये कंपनीच्या प्रत्येक सहाय्यकाची (सब्सिडिअरी) भूमिका निश्चित करण्यात आली होती. याअंतर्गत COVID-19 रुग्णांसाठी केवळ दोन आठवड्यात सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने मुंबई महापालिकेच्या सहाय्याने सेवन हिल्स हॉस्पिटल, मुंबईत 100 बेड असलेल्या सेंटरची स्थापना केली होती. याचा सर्व खर्च रिलायन्स फाऊंडेशन करत आहे.
coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत
याशिवाय विविध सामाजिक संस्थांच्या साथीने रिलायन्स फाऊंडेशन वेगवेगळ्या शहरांमध्ये मोफत अन्न देखील उपलब्ध करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्रातील लोधीवलीमध्ये एक अद्यावत आयसोलेशन फॅसिलिटी तयार करुन जिल्हा प्रशासनाला सोपवली आहे.
मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह सूट्सचं उत्पादन
रिलायन्स लाईफ सायन्सेस अतिरिक्त टेस्ट किट्स आणि कन्झ्युमेबल्सलही निर्यात करत आहे. रिलायन्सने आपली उत्पादन क्षमता वाढवून प्रतिदिन एक लाख फेस मास्क करण्यावर काम करत आहे. याशिवाय पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स जसं की सूट, कपडे इत्यादीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात करण्यावर भर देत आहे.
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत
रिलायन्स सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन पुरवणार आहे. COVID-19 च्या रुग्णांसाठी वापरली जाणारी वाहनं तसंच सरकारी यंत्रणांद्वारे उपलब्ध केलेल्या यादीतील वाहनांसाठी ही सुविधा असेल. आयसोलेशन आणि क्वॉरन्टाईन लोकांचाही यात समावेश असेल.
कामगारांचाही विचार
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंत्राटी आणि कायमस्वरुपी नसलेल्या कामगारांना कामकाज प्रभावित झालेल्या काळाचंही वेतन मिळणार आहे. प्रतिमहिना 30 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्यांना महिन्यातून दोन वेळा पगार मिळेल.
Ratan Tata exclusive interview | दानशूर उद्योगपती रतन टाटा यांची विशेष मुलाखत | ABP Majha