दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हडपसरच्या कादंबरी व चिंतामणी राऊत या बहिण भावाने सुवर्णपदक पटकावले आहे. चिंतामणी हा विशेष मुलांच्या 93 किलो वजन गटात तर कादंबरी ही मुलीच्या सब ज्युनिअर 69 किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व केले. 


दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एकूण 97 देश सहभागी झाले होते. भारतातून 65 खेळाडू सहभागी होते. चिंतामणी बाळासाहेब राऊत पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात 150 किलो आणि बेंच या प्रकारात 70 किलो तर पॉवरलिफ्टींग डेड या प्रकारात 180 किलो उचलून गोल्ड मेडल जिंकले.


पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात कादंबरीने केले जागतिक रेकॉर्ड 


कादंबरी राऊतने पॉवरलिफ्टींग स्कॉट या प्रकारात जागतिक रेकॉर्ड केले आहे. मागच्या वेळेस साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिने 145 किलो उचलून जागतिक रेकॉर्ड केलेला. पण ह्यावेळी कादंबरीने 150 वजन उचलून जागतिक रेकॉर्ड केला आहे. यासोबत स्कॉट प्रकारत गोल्ड मेडल जिंकले.


बेंच या प्रकारात 75 किलो वजन उचलून तिने सिल्वर पदक जिंकले, तर डेड या प्रकारात 140 किलो वजन उचलून अजून एक सिल्वर पदक मिळवले. म्हणजेच एकूण कादंबरीला एक गोल्ड मेडल व दोन सिल्वर मेडल जिंकली.


प्राचार्य संजय मोहिते, प्रशिक्षक टी. बाकी राज, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय मोरे तसेच रवींद्र यादव आणि राजहंस मेहेंदळे व वडील बाळासाहेब राऊत यांचे ह्या दोघ्या बहिण भावांना मार्गदर्शन लाभले.


हे ही वाचा -


Ind vs Aus Test Series : 4 सामने, 4 शतके; ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माच्या जागी 'हा' धडाकेबाज फलंदाजाच मैदान गाजवणार?