CWG Opening Ceremony Live Streaming : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. 28 जुलै पासून ते 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विविध खेळांत जगभरातील टॉपचे खेळाडू सहभागी होतील. पण खेळांना सुरुवात होण्यापूर्वी आज ओपनिंग सेरेमनी अर्था उद्घाटन सोहळा (CWG 2022 Opening Ceremony) पार पडणार आहे. तर हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल तसंच काय मुख्य आकर्षणं असतील ते पाहूया...


आज कॉमनवेल्थ खेळांचा धमाकेदार ओपनिंग सेरेमनी (Opening Ceremony) होणार आहे. या खेळांना आता सुरुवात होणार असून यंदा 72 देशांतील 5 हजार 54 खेळाडू यात सहभागी होतील. 11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 20 विविध खेळांच्या 280 स्पर्धा खेळवल्या जातील.   


काय आहे प्रमुख आकर्षण?


कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये न्यू वेव बँड 'डुरान-डुरान' तसंच हेवी मेटल बँड 'ब्लॅक सबाथ'चा प्रसिद्ध गिटारिस्ट टोनी इओमी याचाही परफॉर्मेंस असेल. तसंच सेक्सोफोनिस्ट सोवेतो किंचसोबत 2020 चा चित्रपट 'ट्रायल ऑफ दी शिकागो सेवन' चा लीड गाणं 'हीयर माय वॉईस' वर एक दमदार परफॉर्मेंस सादर करेल. यावेळी वेस्ट मिडलँड्सच्या 15 गायन समूहांतील जवळपास 700 जण सहभाग घेतील. यावेळी मास्टरमाइंड प्रसिद्ध टीव्ही सीरीज 'पिकी ब्लाइंडर्स'चा क्रिएटर स्टीवन नाइट ही उपस्थित असेल.  


कधी होणार ओपनिंग सेरेमनी?


कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) सर्धेचा ओपनिंग सेरेमनी बर्मिंगहमच्या (Birmingham) अलेक्झांडर स्टेडियममध्ये (Alexander Stadium) पार पडणार आहे.


किती वाजता सुरु होणार कार्यक्रम?


हा सोहळा स्थानिक भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पार पडेल.


कुठे पाहता येणार?


भारतात कॉमनवेल्थ स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.


हे देखील वाचा-