Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Commonwealth Games 2022) आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंसाठी अत्यंत खास ठरला. विशेष म्हणजे भारताच्या आज मैदानात उतरलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदक नावे केलं आहे. नुकताच पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक नावे केलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत मोहितने आता जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला (Aaron Johnson) मात देत कांस्य पदकावर नाव कोरंल आहे.






भारताच्या सर्वच कुस्तीपटूंनी आज कमाल कामगिरी केली. सुरुवातीपासून विजय मिळवणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये महिला कुस्तीपटू दिव्या काकरान आणि मोहित ग्रेवाल पराभूत झाले. पण दोघांनीही कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवला आहे. 


भारताचं कुस्तीतील सहावं पदक 


आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडताना दिसून आले. सर्वात आधी अंशूने रौैप्य नंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने आणि आता मोहित ग्रेवालने कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली आहे.








हे देखील वाचा-