Jeremy Lalrinnunga Wins Gold: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पुरूषांच्या 67 वजन गटात भारताच्या जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinnunga सुवर्णपदक जिंकत बर्मिंगहॅममध्ये देशाचा तिरंगा फडकावला. पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेल्या जेरेमी लालरिनुंगानं आपला दबदबा कायम ठेवत स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेरेमी लालरिनुंगानं आपली प्रतिक्रिया दिलीय. 


जेरेमी लालरिनुंगाची प्रतिक्रिया
"सुवर्णपदक जिंकल्याचा मला आनंद आहे, परंतु मी माझ्या कामगिरीवर समाधानी नाही. मी आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत होतो. तसेच देशासाठी सुवर्ण जिंकणे हा अभिमानाचा क्षण आहे", असं जेरेमी लालरिनुंगानं एएनआयशी बोलताना म्हटलंय.


ट्वीट-



मोठ्या विक्रमाला गवसणी
वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीनं स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 300 किलो ग्रॅम वजन उचललं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आलं. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला. 


पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा
जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील त्याचं पहिलचं वर्ष आहे. याआधी 2018 मध्ये त्यानं युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एवढेच नव्हेतर, गेल्या वर्षी पार पडलेल्या 67 वजनी गटातही त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं. 


हे देखील वाचा-