CWG 2022: कॉमनवेल्थ भालाफेक स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) अंतिम फेरीत भारताची महिला भालेफेकपटू अन्नू राणीनं (Annu Rani) कांस्यपदक पटकावलंय. या स्पर्धेत तिनं 60 मीटर भालाफेक करून तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या केल्सीनं 64 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक पटकावलंय.
भारताची स्टार भालाफेकपटू अन्नू राणीनं कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदक ऑस्ट्रेलियाच्या खात्यात जमा झाली. कॉमनवेल्थ भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अन्नू राणीसमोर ऑस्ट्रेलियाची केल्सी आणि मॅकेन्झीचं मोठं आव्हान होतं. या फेरीत केल्सीनं 64.43 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. तर, मॅकन्झीनं 64.27 मीटर भालाफेकून रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर अन्नू राणीनं 64 मीटर भालाफेक करत कांस्यपदकावर नाव कोरलं.
भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू
सुवर्णपदक-16: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, अल्धौस पॉल.
रौप्यपदक-12: संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर.
कांस्यपदक- 19: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : 'चित भी मेरी, पट भी मेरी', ट्रीपल जम्पमध्ये सुवर्ण पदकासह रौप्यही भारताच्या खिशात, ऐलडॉस पॉलसह अब्दुलाची कमाल
- Commonwealth Games 2022: संदीप कुमारनं जिंकलं कांस्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत दमदार कामगिरी
- Amit Panghal,CWG 2022: अमित पंघालची सुवर्णपदकावर झडप, भारताची पदकसंख्या 43 वर