चेन्नई : प्रोफेशनल कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदिता यांचा कार दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कारने अचानक पेट घेतला, मात्र त्यानंतर दरवाजे लॉक झाल्याने दोघांनाही बाहेर पडता आलं नाही. त्यात अश्विन सुंदर आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.
चेन्नईतील सँथम रोडवर अश्विन सुंदर यांची बीएमडब्ल्यू कार एका झाडाला जाऊन आदळली. झाडाच्या आणि एका भिंतीच्या मध्ये अडकलेल्या कारने अचानक पेट घेतला. मात्र दरवाजे बंद झाल्याने दोघांनाही बाहेर पडता आलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिकांना पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अग्नीशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. आग विझवल्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला.