IND vs SA Playing XI : केपटाऊन कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल शक्य आहे का? पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. टीम इंडियाचा अवघ्या तीन दिवसांत पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. विशेषत: पदार्पणाची कसोटी खेळणारा प्रसिद्ध कृष्ण निष्प्रभ ठरला. प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सहज धावा केल्या. त्यामुळे प्रसीध कृष्ण केपटाऊन कसोटीतून बाहेर पडू शकतो का? अशी चर्चा रंगली आहे.
केपटाऊन कसोटीत मुकेश कुमार नक्की खेळणार!
केपटाऊन कसोटीसाठी प्रसिध कृष्णाची सुट्टी निश्चित असल्याचे मानले जात आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मुकेश कुमार दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव सत्रात चांगलाच घाम गाळत आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुकेश कुमारवर बारीक नजर ठेवून आहे. केपटाऊन कसोटीत प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल शक्य आहेत?
मुकेश कुमारने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मुकेश कुमारने पदार्पणाच्या कसोटीत 48 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजा केपटाऊन कसोटीत पुनरागमन करू शकतो. रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर रवी अश्विनला बाहेर बसावे लागेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. केपटाऊन कसोटी भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होईल.
इतर महत्वाच्या बातम्या