पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुलने पंतची जागा घेतली आणि नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने 75.33 च्या सरासरीने 452 धावा केल्या. पंतच्या भयंकर अपघातावर टीम इंडिया आणि आयपीएलमधील त्याचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी अक्सर पटेलने थरारक अनुभव सांगितला आहे.
माझ्या मनात पहिला विचार आला की...
आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सने X (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अक्षरने रिषभ पंतच्या अपघाताविषयी सांगितले. अक्षर म्हणाला की, “सकाळी 7 किंवा 8 वाजता रिंग वाजली. प्रतिमा दिदीने (इशांत शर्माची पत्नी) मला फोन केला. प्रतिमा दिदीने मला विचारले की तू रिषभशी शेवटचे कधी बोलली होतास? मी म्हणालो काल होणार होती, पण नंतर करू असे वाटले. प्रतिमा दिदी म्हणाला की जर तुझ्याकडे त्याच्या (रिषभ पंत) आईचा फोन नंबर असेल तर तो शेअर कर. त्याचा अपघात झाला आहे. जेव्हा मला कळले की रिषभ पंतचा अपघात झाला तेव्हा मला वाटले की हा भाऊ गेला आहे. प्रत्येकजण मला पंतबद्दल विचारू लागला, कारण सगळ्यांना वाटले की पंत माझ्याशी शेवटचे बोलला असावा.
नवीन वर्षात पंतच्या पुनरागमनाची हुसेनला आशा
इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन 2024 मध्ये ऋषभ पंतच्या यशस्वी पुनरागमनासाठी आशावादी आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी पंतचे क्रिकेटमध्ये पुनरागमन अपेक्षित आहे. आयसीसीने हुसेनचा हवाला देत म्हटले की, 'सोशल मीडियावर, आम्ही बरे झाल्यानंतरची त्याची सुरुवातीची पावले पाहिली आणि नंतर त्याचे जिममध्ये प्रशिक्षण आणि क्रिकेट खेळताना आणि रिकी पाँटिंगसोबतचे त्याचे फोटो पाहिले. अॅशेसमध्ये मी रिकीसोबत होतो आणि रिकीने मला सांगितले की तो कसा प्रगती करत आहे. तो ‘बॉक्स ऑफिस’ (हिट) क्रिकेटर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या