माजी कसोटीवीर चेतन शर्मा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. चेतन शर्मा सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी यांची जागा घेतील. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली.
मदन लाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC), रुद्र प्रताप सिंह आणि सुलक्षणा नाईक यांनी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या तीन सदस्यांची निवड केली. चेतन शर्मा एकदिवसीय सामन्यात प्रथमच भारताकडून हॅटट्रिक घेण्यासाठी ओळखला जातात. वरिष्ठ निवड समितीच्या तीन सदस्यांची निवड करण्यासाठी समितीने गुरुवारी ऑनलाइन मुलाखती घेतल्या होत्या.
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शर्मा यांच्यासह ॲबी कुरुविला आणि देबाशीष मोहंती यांचाही निवड समितीत समावेश. सुनील जोशी आणि हरविंदरसिंग निवड यांना समितीत कायम ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, "समितीने ज्येष्ठतेच्या (एकूण कसोटी सामन्यांची संख्या) आधारे पुरुष सीनियर क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांच्या नावाची शिफारस केली. क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) एक वर्षाच्या कालावधीनंतर उमेदवारांचा आढावा घेईल आणि बीसीसीआयकडे याची शिफारस करेल."
संबंधित बातमी :
आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय