मुंबई : कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना आता ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणारी विमानसेवा देखील केंद्र सरकारने रद्द केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.


युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ह्या खास गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या देशांमध्ये लक्षणे नसल्याने प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट केली जात नाही. अशा प्रवाशांना (ज्यांनी कोविड चाचणी केली नाही.) 7 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. या क्वॉरंटाईनसाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहे. अशा प्रवाशांची RTPCR चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुख्य सचिवांनी दिली आहे.




कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तर प्रवाशांना घरी सोडण्यात येणार आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल आणि रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याच हॉटेल किंवा क्वॉरंटाईन सेंटरमध्ये त्यांना पुढील 14 दिवस ठेवले जाणार आहे.


ब्रिटनहून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर भारताकडून बंदी
जगभरातील देश कोरोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.

ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :
Pneumonia Vaccine | न्युमोनियावरील पहिली भारतीय लस तयार; कधी आणि कशी होणार उपलब्ध?

कोरोना लसीत डुक्कराची चरबी असेल तर 'हराम', सरकारनं आधीच माहिती द्यावी- ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा

#MumbaiLocal जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार - वडेट्टीवार