केपटाऊन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) केपटाऊन कसोटीतून बाहेर पडला आहे. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान त्याला पेल्विकचा त्रास झाला होता. दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.






क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 वर्षीय कोएत्झीला पेल्विकचा त्रास जाणवत होता, जो सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना खराब झाला होता. शुक्रवारी त्याचे स्कॅनिंग करण्यात आले ज्यावरून दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट झाले. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोएत्झीला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


बदली खेळाडूला संघात स्थान नाही 


त्याच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूला संघात स्थान देण्यात आलेले नाही. कागिसो रबाडा, मार्को जॅनसेन आणि नांद्रे बर्जर व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेकडे लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डरमध्ये वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. कोएत्झी पहिल्या कसोटीत 19 धावा करण्यासोबतच 1 बळीही घेतला.






दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमध्ये तीन दिवसांत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बवुमा डाव्या हाताच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला होता. 


न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणाऱ्या नवीन वर्षाच्या कसोटीसाठी त्याच्या जागी फलंदाज झुबेर हमजाचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत अनुभवी सलामीवीर डीन एल्गरच्या नेतृत्वात प्रोटीज संघाचे नेतृत्व करेल, ज्याने सेंच्युरियनमध्ये 185 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. डावखुरा सलामीवीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी त्याच्या अंतिम कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल.


दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिका कसोटी संघ


डीन एल्गर (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, मार्को जानसेन, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन.