मुंबई: लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत आज बीसीसीआयची विशेष समितीच महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) पार पडली. यामध्ये लोढा समितीनं सुचवलेल्या दोन शिफारसी बीसीसीआयनं मान्य केल्या असून चार शिफारशींविरोधात बीसीसीआय सुप्रीम कोर्टात जाणार आहे.


या दोन शिफारसी बीसीसीआयला मान्य :

- तीन सदस्यीय निवड समिती बीसीसीआयला मान्य

- पदाधिकाऱ्यांसाठी कमाल ७० वर्षांची वयोमर्यादा बीसीसीआयला मान्य

दोन शिफारसी बीसीसीआयनं मान्य केल्या असल्या तरीही चार शिफारसी अजूनही बीसीसआयनं मान्य केलेल्या नाहीत.

बीसीसीआयच्या विशेष समितीला लोढा समितीच्या चार शिफारशींबाबत हरकत असून, बीसीसीआय त्याबाबत पुनर्विचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. या प्रकरणी १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.

या चार शिफारसींविरोधात बीसीसीआय सुप्रीम कोर्टात जाणार:

- एक राज्य, एक मत

- बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना सलग ९ वर्षे काम करण्याची संधी द्यावी आणि दर तीन वर्षांनी तीन वर्षे सक्तीच्या विश्रांतीचा पुनर्विचार व्हावा

- बीसीसीआयवर निवडून आलेले पदाधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्या अधिकारांमध्ये फरक असावा.

- लोढा समितीच्या शिफारशींनुसार भविष्यात बीसीसीआयचा कार्यभार पाहणाऱ्या ॲपेक्स कौन्सिललाही तीन वर्षे सक्तीच्या विश्रांतीची अट

बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली.