मुंबई : वर्ल्ड कप 2019 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय टीमची घोषणा होण्याआधी अनेकांनी संभाव्य टीमबाबत अंदाज बांधले होते. मात्र वर्ल्ड कपसाठी कोणते खेळाडू पाठवायचे याची जबाबदारी बीसीसीआयने निवड समितीच्या सदस्यावर सोपवलेली असते. मात्र ज्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली, त्यांनी किती क्रिकेट खेळलं आहे आणि त्यांची कारकिर्द कशी होती, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीची मुख्य जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्यावर आहे. प्रसाद यांच्या व्यतिरिक्त या समितीत देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही. या पाचही सदस्यांचा मिळून केवळ 31 वन डे सामन्यांचा अनुभव आहे.
VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर
एमएसके प्रसाद
43 वर्षीय मन्नवा श्रीकांत प्रसाद विकेटकीपर, फलंदाज यांनी प्रथम श्रेणी सामन्यात सहा शतक ठोकले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द प्रभावशाली नव्हती. प्रसाद यांनी एकूण 6 टेस्ट आणि 17 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वन डे सामन्यात त्यांनी 14.55 च्या सरासरीने 131 धावा केल्या असून 63 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
देवांग गांधी
47 वर्षीय देवांग गांधी यांना एकूण 4 टेस्ट आणि 3 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. तीन वन डे सामन्यात देवांग यांनी 16.33 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.
शरणदीप सिंह
शरणदीप सिंह यांना एकूण 3 टेस्ट आणि 5 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी पाच वनडे सामन्यात 15.66 च्या सरासरीने 47 धावा केल्या आहेत. शरणदीप यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे.
जतिन परांजपे
जतिन परांजपे यांनी प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र त्यांनी भारताकडून केवळ चार वन डे सामने खेळले आहेत.
गगन खोडा
गगन खोडा 1991-92 मध्ये रणजी सामन्यात शतक ठोकल्याने चर्चेत आले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 300 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. मात्र त्यांची वन डे आतंरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या दोन सामन्यांची आहे.
संबंधित बातम्या
विश्वचषकाची टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड
World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?