नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उद्याचा राजकोटमधील कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता बीसीसीआयने वर्तवली आहे. राज्य क्रिकेटला सामन्याच्या नियोजनासाठी पैसे खर्च करण्यास परवानगी द्या, अशी मागणी बीसीसीआयने केली आहे.

या मागणीसाठीचा अर्जही बीसीसाआयने सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर लोढा समितीची देखरेख असल्याने खर्चाचे जास्त अधिकार हे आता बीसीसीआयऐवजी लोढा समितीकडे गेले आहेत.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारसी मान्य केल्या तरच आर्थिक अधिकार मिळतील, असं स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयला निधी उपलब्ध न करुन दिल्यास राजकोटचा कसोटी सामना रद्द होऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी दिली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

तुमचा खर्च तुम्हीच करा, BCCI चं ईसीबीला पत्र


भारत विरुद्ध इंग्लंड, संपूर्ण वेळापत्रक


रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा ब्रेक


गांगुली म्हणतो आता इंग्लंडला व्हाईटवॉश द्या, तर वॉन म्हणतो..


भारत विरुद्ध इंग्लंड, संपूर्ण वेळापत्रक


मुरली विजयसोबत सलामीला कोण?


ईशांत शर्माचं पुनरागमन, रोहित शर्माला विश्रांती


‘धोनीला कर्णधारपदावरुन हटवलं, तर भारताची ती मोठी चूक ठरेल’