नवी दिल्ली : भारताच्या कसोटी संघाच्या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनात बीसीसीआयनं घसघशीत वाढ केली आहे. प्रत्येक कसोटीसाठी आता खेळाडूंना पंधरा लाख रुपये मिळणार आहेत.


भारताकडून कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाठी सात लाख रुपये मानधन मिळायचं. त्यात आता दुपटीहून अधिक वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. खेळाडूंना आता प्रत्येक कसोटीसाठी पंधरा लाख रुपये मिळतील.

राखीव खेळाडूंना आता मानधन म्हणून प्रत्येक कसोटीचे सात लाख रुपये मिळणार आहेत. कसोटी क्रिकेटकडे युवा खेळाडूंचा ओढा वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.