मुंबई : चौथ्यांदा विश्वचषक पटकावून इतिहास रचणाऱ्या अंडर-19च्या टीम इंडियावर आता बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूसाठी बक्षीस जाहीर केलं आहे.


अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने 30 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. यासोबतच सपोर्ट स्टाफला देखील प्रत्येकी 20 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.


अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतनं 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या.

भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता.