अहमदनगर : अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करुन एका विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वर्षा सोनवणे असं या विवाहितेचं नाव असून सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पतीच्या अत्याचाराविरुद्ध न्याय मिळत नसल्यानं तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे.
वर्षा सोनवणेचं कर्जत तालुक्यातील चापडगावच्या अमोल सोनवणेशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पतीकडून वर्षाला वारंवार मारहाण, शिवीगाळ केली जात होती. तसंच घरातून बाहेर काढण्याच्या प्रकारानंही ती वैतागली होती.
या संपूर्ण प्रकरणी वर्षाने 19 जानेवारीला दिलासा सेलला अर्ज केला होता. या अर्जावर 30 जानेवारीला सुनावणी होती. यावेळी वर्षा हजर होती. मात्र, पती अमोलच सुनावणीला हजरच नव्हता. या सर्व प्रकाराला वैतागून वर्षाने पोलीस अधिक्षक कार्यालयातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताची पोलिसांनी तात्काळ वर्षाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2018 12:25 PM (IST)
अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करुन एका विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -