Domestic Cricketers Fee Hike: देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी ट्विट करत सांगितले की, बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्या ट्वीटनुसार 40 पेक्षा अधिक मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना आता 60,000 रुपये मिळणार आहे. तर 23 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 पेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेटपटूंना 20,000 रुपये मिळणार आहे.
KKR vs RCB Live : थोड्याच वेळात भिडणार कोलकाला विरुद्ध बंगळुरु, कुठे पाहाल सामना
2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे.
काय म्हणाले जय शाह आपल्या ट्वीटमध्ये?
बीसीसीआय सचिव जय शाह ट्वीट करत म्हणाले, मला स्थानिक क्रिकेटपटूंच्या मॅचची फी वाढवण्यात आल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. सीनियर्स - INR 60,000 (40 मॅचपेक्षा अधिक), अंडर 23- INR 25,000, अंडर 19- INR 20,000
MS Dhoni : धोनीची परफेक्ट स्ट्रॅटेजी अन किशनचा बळी; काय घडलं मैदानावर नक्की वाचा..
आतापर्यंत किती फी देण्यात येत होती?
आता पर्यंत स्थानिक क्रिकेटपटूंना रणजी ट्रॉफी आणि विजय ट्रॉफी खेळण्याकरता प्रत्येक मॅचला 35,000 रुपये मिळत होते. त्याशिवाय सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक मॅचला 17,500 रुपये दिले जातात. ज्या खेळाडूंना मॅच खेळण्याची संधी मिळते त्यांना हे पैसे दिले जातात. तर राखीव खेळाडूंना अर्धी रक्कम दिली जाते.