KKR vs RCB Live Updates: काल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. विराट कोहलीचा बंगळुरु आणि मॉर्गनच्या कोलकाता संघ भिडणार आहे. बंगळुरु संघ त्यांच्या यूएईमधील अभियानाची सुरुवात कोलकाता विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या दोन संघातील हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना आहे.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीने केकेआरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. आरसीबीमध्ये दिग्गज खेळाडूंची कमतरता नाही आणि त्यामुळेच संघ व्यवस्थापनासमोर सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे. केकेआरवीरुद्ध सामन्यामध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल हे दोघे फलंदाजीला सुरुवात करतील. पडिक्कलने या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स फलंदाजीसाठी येऊ शकतो.
केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये आरसीबीची मधली फळी प्रभावशाली ठरू शकते. यामध्ये सहाव्या क्रमांकावर शाहबाज अहमद आणि त्यापाठोपाठ श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. हसरंगासाठी हा सामना आयपीएमधील पदार्पण सामना ठरेल. काईल जेमीसन, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा संघात सामावेश असू शकतो. तसोच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचाही संघात समावेश असेल.
कुठे पाहाल सामना
बंगळुरु आणि कोलकाता दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या प्रसारणाचे सर्वाधिकार स्टार इंडिया नेटवर्ककडे आहेत. त्यामुळं चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना पाहू शकतील. विशेष म्हणजे स्टार इंडियाच्या चॅनल्सवरती आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण सामन्याचा आनंद घेऊ शकाल. मोबाईलवरही आपण हॉट स्टारच्या अॅपवर सामना पाहू शकाल.
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद , वानिंदू हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
केकेआर : इयॉन मॉर्गन (कर्णधार), गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, कुलदीप यादव, एम. प्रसिद्ध कृष्णा,, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, सुनील नारायण