रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत भारताच्या बबिताकुमारीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. बबिताकुमारीला या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
53 किलो वजनी गटाच्या लढतीत ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मारियाने बबितावर 5-1 असा विजय मिळवला. त्यामुळे बबिताकुमारीची सुवर्ण किंवा रौप्यपदकासाठी खेळण्याची संधी हुकली.
त्यानंतर मारिया प्रेवोलाराकीनं फायनल गाठण्याची कामगिरी बजावली तर बबिता रिपेचाजमधून ब्राँझपदकासाठी खेळण्याची संधी लाभणार होती. पण मारियाला व्हेनेझुएलाच्या पैलवानाकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मारियाच्या पराभवासह बबिताचं रिओ ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलं.