Commonwealth Games 2022: ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) गणना जगभरातील आक्रमक गोलंदाजांमध्ये केली जात आहे. ऑस्ट्रेलियानं 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलयाच्या संघाचा भाग होता. स्टार्कची पत्नी एलिसा व्हिली (Alyssa Healy) एक उत्कृष्ट विकेटकिपर आहे. सध्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ती ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. महत्वाचं म्हणजे, क्वचितच लोकांना माहिती असेल स्टार्कचा धाकटा भाऊ ब्रेडन स्टार्क (Brandon Starc) हा एक अॅथलेटिक्स आहे आणि त्यानं सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी रौप्यपदकही जिंकलंय. 


उंच उडीत ब्रेन्डन स्टार्कनं रौप्यपदक जिंकलं
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये देखील ब्रेन्डन स्टार्कनं उंच उडीमध्ये रौप्यपदक जिंकलंय. बुधवारच्या सामन्यात ब्रेंडन स्टार्कनं 2.25 मीटरची उडी मारली. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. याच स्पर्धेत भारताच्या तेजस्वीन शंकरनं देशासाठी कांस्यपदक जिंकलंय.


ब्रेन्डन स्टार्कची कारकिर्द
ब्रेंडन स्टार्कनं 2010 मध्ये युवा ऑलिम्पिकद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2.19 मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली नव्हती आणि तो 8 व्या स्थानावर राहिला. त्यानंतर ब्रेंडन स्टार्कने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, जिथे तो उंच उडीच्या अंतिम फेरीत 15 व्या स्थानावर राहिला.


कॉमनवेल्थ 2022 पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सहाव्या दिवशीच्या अखेरपर्यंत तब्बल 123 पदक जिंकली आहेत. ज्यात 46 सुवर्णपदक, 38 रौप्यपदक आणि 39 कांस्यपदकांचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-