Australia vs India, 2nd Test : पहिल्या कसोटीमध्ये पलटवार करून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या टीम इंडियाची दुसऱ्या कसोटीमध्ये मात्र धूळधाण उडाली आहे. आज (6 डिसेंबर) पिंक टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची तोफ असलेला मिशेल स्टार्क पुन्हा एकदा टीम इंडियासाठी काळ बनून आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी केली. मात्र, यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूवर स्टार्कची शिकार ठरला. त्याला डावाच्या पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू करत पहिलं यश मिळवून दिलं, पण त्यानंतर राहुल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र, संघाच्या 69 धावांवर राहुलला जीवदान मिळून सुद्धा फायदा उठवता आला नाही.






मिशन स्टार्कने राहुलला बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या किंग विराट कोहलीला सुद्धा चकवा देत बाद केल्याने टीम इंडियाची अवस्था एक बाद 69 तीन बाद 77 अशी झाली. चहापानाला खेळ थांबण्यासाठी काही षटके बाकी असतानाच गिलला सुद्धा बाद करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलून दिले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये एक बाद 69 वरून 4 बाद 81 अशी स्थिती झाली. आता मैदानामध्ये वापसी करत असलेला कॅप्टन रोहित शर्मा आणि ऋषभ पंत असून चहापानासाठी खेळ थांबला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आता ऋषभ पंत आणि रोहित शर्मा समोर टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेण्याचे आव्हान असेल. 






इतर महत्वाच्या बातम्या