Pushpa 2 Box Office Collection Day 1 In Hindi: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) रिलीज झाला आणि भारतातील सिनेइंडस्ट्री पुरती हादरली. चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली होती. अखेर मोस्ट अवेटेड फिल्म रिलीज झाली आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली. या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की, आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले. 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासूनच प्रत्येक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसले. यासह 'पुष्पा 2' ची भव्य सुरुवात झाली आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचा सलामीवीर ठरला. 'पुष्पा 2' नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केलं? सविस्तर जाणून घेऊयात...
हिंदी भाषेत 'पुष्पा 2' नं पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला?
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावली. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटानं धुमाकूळ घातला होत, तर थिएटरमध्ये आल्यानंतर 'पुष्पा 2'ने खळबळ उडवून दिली. शाहरुख असो की प्रभास, 'पुष्पा 2' नं एकाचाही रेकॉर्ड टिकू दिला नाही. एक, एक करुन सर्वांचे रेकॉर्ड पुष्पानं मोडीत काढले. चित्रपटानं बक्कळ कमाई केली आणि देशातील हाईएस्ट ओपनरचा मान पटकावला. अशातच आता पुष्पा 2 चे चित्रपटाच्या हिंदी भाषेत केलेल्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' नं रिलीजच्या पहिल्या दिवशी हिंदी भाषेत 67 कोटींचं कलेक्शन केलं आहे. दरम्यान, हे सुरुवातीचे आकडे आहेत. ऑफिशिअल आकडे आल्यानंतर या आकड्यांमध्ये आणखी बदल होऊ शकतात.
'पुष्पा 2'नं तोडले 'जवान'चे सर्व रेकॉर्ड
'पुष्पा 2' रिलीज झाल्यानं तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये धाव घेतली. 2021 च्या ब्लॉकबस्टर पुष्पाच्या या सिक्वेलनं अनेक रेकॉर्ड मोडले. अशातच आता पुष्पानं थेट बॉलिवूडच्या किंग खानला टक्कर दिली आहे. शाहरुखच्या जवाननं पहिल्या दिवशी रिलीज झाल्यानंतर 65 कोटी रुपये कमावले होते. तर, 'पुष्पा 2'चं हिंदी भाषेत ओपनिंग डे कलेक्शन 67 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ 'पुष्पा 2' नं 'जवान' ला 2 कोटींची पछाडलं आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 'पुष्पा 2' कोणता बेंचमार्क सेट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वांच्या नजरा अल्लू अर्जुन आणि रश्मिका स्टारर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :