पुणेविश्वचषक 2023 च्या 43व्या सामन्यात बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 306 धावा केल्या. येथे बांगला संघाच्या सर्व टॉप-6 फलंदाजांनी 30+ धावा केल्या. तौहीद हृदयॉय आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी दमदार खेळी केली.


पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाज विकेटवरून चांगला स्विंग घेतील, अशी आशा कमिन्सला होती. मात्र, तसे झाले नाही आणि बांगलादेशच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच वेगवान फलंदाजी करत कांगारू गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला.






वेगवान सुरुवातीमुळे बांगलादेशची त्रिशतकी मजल 


बांगलादेशकडून तनजीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 11.2 षटकांत 76 धावा जोडल्या. या  धावसंख्येवर तनजीद पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 34 चेंडूत 36 धावा केल्या. यानंतर लिटन दासने कर्णधार नझमुल हुसेन शांतोसह अवघ्या 30 धावा जोडल्या असताना अॅडम झाम्पाने त्याला लॅबुशेनकरवी झेलबाद केले. लिटन दासही 36  धावा करून बाद झाला. येथून कॅप्टन शांतोला तौहीद हृदयाची साथ मिळाली. दोघांमध्ये 64 धावांची भागीदारी झाली.






तौहीदने 79 चेंडूत 74 धावा केल्या 


शांतो (45) एकूण 170 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर महमुदुल्लाहच्या साथीने तौहीदने 44 धावांची भर घातली. महमुदुल्लाह 28 चेंडूत 32 धावा करून धावबाद झाला. 214 धावांवर 4 विकेट पडल्यानंतर मुशफिकर रहीमने (21) तौहीदला काही काळ साथ दिली. रहीम बाद झाल्यानंतर तौहीदही एकूण 286 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 79 चेंडूत 74 धावा केल्या.


बांगलादेशचे तीन फलंदाज धावबाद 


तौहीदनंतर बंगाली डाव मंदावला नाही. मेहदी हसन मिराझने 20 चेंडूत 29 धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला 300 च्या पुढे नेले. अशा प्रकारे बांगलादेश संघाने 8 गडी गमावून 306 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाने 2-2 आणि मार्कस स्टॉइनिसने एक विकेट घेतली. येथे बांगलादेशचे तीन खेळाडू धावबाद झाले.


इतर महत्वाच्या बातम्या