Diwali 2023: सुमारे 500 वर्षांनंतर दिवाळीत (Diwali 2023) ग्रहांचा एक अतिशय चांगला संयोग होत आहे. यंदा दिवाळीत चार राजयोग तयार होत आहेत. हे चार राजयोग चार राशींसाठी अतिशय शुभ सिद्ध होणार आहेत. 2024 मध्ये चार राशींना खूप चांगले दिवस येतील, त्यांना चांगला धनलाभ होईल. तसेच या राशींच्या लोकांची परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर 4 राशींना नशिबाची साथ मिळेल आणि 2024 मध्येही या 4 राशींवर देवी लक्ष्मी प्रसन्न राहील.


दिवाळीत शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत, म्हणजेच कुंभ राशीत बसून शश नावाचा राजयोग निर्माण करत आहे. त्याच वेळी सूर्य आणि मंगळ तूळ राशीत भ्रमण करत असल्यामुळे आयुष्मान राजयोग तयार होत आहे. याशिवाय गुरू आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी राहून गजकेसरी राजयोग निर्माण करत आहेत. तर चंद्र आणि मंगळ तूळ राशीत असल्याने महालक्ष्मी योग तयार होत आहे. 2024 हे वर्ष कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे ते जाणून घेऊया.


मेष रास (Aries Horoscope)


दिवाळीनंतर मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुमचं उत्पन्न दुप्पट होईल. तसंच, तुम्हाला 2024 मध्ये परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशातूनही तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना काही विशेष लाभ मिळेल, ज्यासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत होता. याशिवाय, तुमचं आरोग्य चांगलं राहील, ज्यामुळे तुम्ही एकामागून एक अनेक कामं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. याशिवाय तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांचीही साथ मिळेल.


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतर चांगला काळ सुरू होईल. भूतकाळात तुमचं झालेलं आर्थिक नुकसान या काळात सुधारेल. 2024 मध्ये तुम्हाला उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील मिळतील. तुम्हाला 2024 मध्ये नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणारे लोक स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एवढंच नाही, तर या काळात केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल.


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना दिवाळीनंतर नशिबाची साथ मिळू लागेल. याशिवाय मकर राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. या काळात तुम्ही असं काही काम कराल, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल.


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांना 2024 मध्ये सरकारी क्षेत्रातून लाभ मिळतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित तुमचं कोणतंही काम अडकलं असेल, तर ते दिवाळीनंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे, सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठेचे फायदे मिळतील. याशिवाय तुमचं वैवाहिक जीवनही छान असणार आहे. तुमच्या नात्यातील अंतर संपणार आहे. एकंदरीत, 2024 हे वर्ष तुमच्या करिअरसाठी खूप लकी ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी झाडूचे 'हे' खास उपाय करा, आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, कौटुंबिक सुख मिळेल