मुंबई : बीसीसीआयच्या इंडियन प्रीमियर लीगच्या 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठीच्या मीडिया हक्कांसाठी आज मुंबईत लिलाव होत आहे. जगभरातले अठरा नामांकित उद्योगसमूह या लिलावात सहभागी होणार असून, या लिलावातून बीसीसीआयला वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाईची अपेक्षा आहे.
आयपीएलचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी स्टार इंडिया आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कमध्ये मुख्य चुरस राहिल. आयपीएलच्या मीडिया हक्कांची टेलिव्हिजन आणि डिजिटल अशी दोन माध्यमांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
टेलिव्हिजन विभागात भारतीय उपखंड आणि उर्वरित देशांसाठी असे वेगवेगळे हक्क देण्यात येतील. डिजिटल हक्कांमध्ये इंटरनेट आणि मोबाईलचा समावेश आहे. आयपीएलच्या गेल्या दहा मोसमांच्या टेलिव्हिजन प्रक्षेपणाचे हक्क हे सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे होते.
सोनीने 2008 साली 8200 कोटी रुपये मोजून आयपीएलच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क मिळवले होते. त्यानंतर 2015 साली नोवी डिजिटलने 302.2 कोटी रुपये मोजून, तीन वर्षांसाठी आयपीएलच्या डिजिटल प्रसारणाचे हक्क मिळवले.
आयपीएलच्या पुढच्या पाच वर्षांसाठीच्या मीडिया हक्कांसाठी आज होत असलेल्या लिलावात एकूण वीस हजार कोटी रुपयांची बोली लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही आजचा लिलाव ऐतिहासिक ठरण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयपीएल मीडिया हक्कांसाठी मुंबईत लिलाव, ऐतिहासिक बोलीची शक्यता
विजय साळवी, एबीपी माझा
Updated at:
04 Sep 2017 12:06 AM (IST)
जगभरातले अठरा नामांकित उद्योगसमूह या लिलावात सहभागी होणार आहेत. या लिलावातून बीसीसीआयला वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाईची अपेक्षा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -