Asian Games 2023: भारतीय पॅरा अॅथलीट रमन शर्मा (Raman Sharma) यानं चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 (Asian Para Games 2023) मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर T38 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी नवा आशियाई आणि क्रीडा विक्रम रचला. रमण शर्मानं 4:20.80 मिनिटांत शर्यत पूर्ण करून अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. रमनच्या या पराक्रमामुळे भारताच्या क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या आता 20 झाली आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला रमनपूर्वी तिरंदाज शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड खुल्या स्पर्धेत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदाचा 144-142 नं पराभव करून सुवर्णपदक पटकावलं.
गुरुवारी, भारतीय पॅरा-अॅथलीट्सनं इतिहास रचत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. देशानं आशियाई पॅरा गेम्समध्ये आतापर्यंतची सर्वोच्च पदकतालिका नोंदवली. पॅरा-अॅथलीट्सनं 2018 च्या 72 पदकांचा विक्रम मोडीत काढत यंदा 80 पदकं पटकावली आहेत. 2023 च्या आवृत्तीत, भारतानं आतापर्यंत 80 हून अधिक पदकं जिंकली आहेत आणि चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या शोपीस इव्हेंटमध्ये ते मजबूत होत आहेत.
मोदींकडून पॅरा-अॅथलीट्सचं कौतुक
"आशियाई पॅरा गेम्समध्ये एक अभूतपूर्व यश, भारतानं अभूतपूर्व 73 पदकं जिंकली आणि तरीही मजबूत राहून, जकार्ता 2018 आशियाई पॅरा गेम्समध्ये आपलाच 72 पदकांचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला! हा महत्त्वपूर्ण प्रसंग आमच्या खेळाडूंच्या अथक निर्धाराला मूर्त रूप देतो. एक गर्जना करणारा जयघोष आमच्या अपवादात्मक पॅरा-अॅथलीट्ससाठी ज्यांनी इतिहासात आपले नाव कोरले आहे, प्रत्येक भारतीयाचं हृदय अपार आनंदानं भरलेलं आहे. त्यांची वचनबद्धता, दृढता आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी अविचल प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहेत! ही ऐतिहासिक कामगिरी भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शक प्रकाश देणारी, प्रेरणादायी ठरू दे." असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :