World Cup 2023 Points Table Updated After ENG vs SL: वर्ल्डकप 2023 च्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा (England) 8 विकेट्सनी एकतर्फी पराभव केला. श्रीलंकेच्या (Sri Lanka Beat England) या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. विजय मिळवून श्रीलंकेनं इंग्लंडला जेतेपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर काढल्यातच जमा आहे. तसेच, यामुळे पाकिस्तानच्या अडचणीही वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या धमाकेदार विजयानंतर श्रीलंका पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर तर पराभूत झालेला गतविजेता इंग्लंडचा संघ थेट नवव्या क्रमांकावर घसरला आहे. 


वर्ल्डकपमधील पहिले तीन सामने गमावल्यानंतर श्रीलंकेचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह श्रीलंका 4 पॉईंट आणि निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. यापूर्वी पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ होता. आता श्रीलंकेच्या विजयानंतर 4 गुण असूनही खराब नेट रनरेटमुळे पाकिस्तानची सहाव्या स्थानावर गच्छंती झाली आहे.  


टॉप-4 मध्ये कोणताही बदल नाही                                          


टॉप-4 बद्दल बोलायचं झालं तर त्यात कोणताही बदल झालेला नाही. यजमान भारत 10 पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंड 8 पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या नेट रनरेटमधील फरकामुळे दोघांच्या गुणतालिकेतील स्थानांमध्ये फरक आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.


इतर संघांची परिस्थिती काय?                


पॉईंट टेबलमध्ये पुढे जाताना पुन्हा एकदा स्पर्धेत उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंका 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आली असून निगेटिव्ह -0.205 नेट रनरेट आहे. यानंतर, पाकिस्तान 4 गुणांसह सहाव्या स्थानावर असून निगेटिव्ह -0.400 च्या नेट रनरेट आहे आणि अफगाणिस्तान 4 गुण आणि निगेटिव्ह -0.969 च्या नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. यानंतर बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँड्सचे संघ 2-2 गुणांसह अनुक्रमे आठव्या, नऊ आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. तिन्ही संघांच्या नेट रनरेटच्या फरकामुळे पॉईंट टेबलमधील स्थान वर-खाली आहे.              


महत्त्वाच्या इतर बातम्या :               


ENG Vs SL, Innings Highlights : श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा