Asian Games 2023 Record : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 12 पदके जिंकली. भारताने मंगळवारी 3 सुवर्णपदके जिंकली. याशिवाय भारतीय खेळाडूंनी 5 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकली. त्याचबरोबर, आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी 18 सुवर्ण पदकांसह 31 रौप्य आणि 32 कांस्यपदक जिंकले आहेत. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 81 झाली आहे.



भारताने आपला जुना विक्रम मोडीत काढला


आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेच्या 72 वर्षांच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी 18 सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा आपला जुना विक्रम मागे टाकला आहे. यापूर्वी, आशियाई क्रीडा 2018 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 70 पदके जिंकली होती, जी भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. 16 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त, भारताने आशियाई खेळ 2018 मध्ये 24 रौप्य पदके आणि 30 कांस्य पदके जिंकली. पण आता भारताने आपला जुना विक्रम मागे टाकला आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 81 पदके जिंकली आहेत.


 


 






 



चीनचा दबदबा कायम, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर...


मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनने 166 सुवर्ण पदकांसह एकूण 304 पदके जिंकली आहेत. यानंतर जपान 35 सुवर्णांसह 135 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण कोरिया 33 सुवर्णांसह 144 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


 






आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून सुरूवात


आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे.  दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


 विश्वचषकाच्या महायुद्धाला अहमदाबादच्या रणांगणात तोंड फुटणार, इंग्लंड-न्यूझीलंड संघांमध्ये सलामीची लढाई