Horoscope Today 5 October 2023: आज 05 ऑक्टोबर 2023 गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलाच्या करिअरची काळजी वाटत असेल, तर चिंता करू नका. वृश्चिक राशीचे लोक आज घराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करू शकतात. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा गुंतागुंतीचा राहील. आज तुमचा तुमच्या व्यवसायातील एखाद्या भागीदाराशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा एखादा करार अंतिम होत असताना अडकून पडू शकतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्येमुळे चिंतेत असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांना समजून घ्यावं लागेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट देखील नेऊ शकता.


आज तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या हुशारीचा वापर करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, तरच तुमचा दिवस चांगला जाईल. प्रवास करताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून त्यांच्या मनात सुरू असलेल्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायासाठी जवळच्या ठिकाणीच जाण्याचा असेल. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्ही त्याला एखादं छोटं काम सुरू करुन देऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला त्याच्या करिअरबद्दल वाटणारी चिंता कमी होईल. तुम्ही काहीतरी विशेष करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात तुम्ही जिंकू शकता, परंतु तुम्हाला त्यात अधिक मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही यशाची शिडी चढू शकाल.


जर तुम्ही नवीन घर, वाहन, दुकान इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामात दिरंगाई करू नका, अन्यथा तुमचे सहकारी याचा फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, ज्यामुळे ते त्यांच्या वरिष्ठांच्या नजरेत चांगले बनतील आणि तुम्हाला वाईटपणा पत्करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आदर मिळेल.


मिथुन (Gemini)


सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या काही योजनांना गती मिळेल, त्यामुळे व्यवसायात तुमचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. जे लोक मोठ्या गुंतवणुकीची तयारी करत होते, त्यांच्यासाठी थोडा वेळ थांबणं चांगलं राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन उपकरणं समाविष्ट करू शकता, ज्यामुळे तुमचे उत्पन्न आणखी वाढेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चाची सहज गणना करू शकाल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या आवश्यक गरजा वेळेत पूर्ण कराव्या लागतील, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील.


एकूणच आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असेल, कारण तुम्ही एखाद्यासोबत भांडला असाल तर तेही आज ठीक होईल आणि भांडण तिथेच संपेल. पण जे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी त्यांची मतं लोकांसमोर मांडली पाहिजेत, तरच लोक त्यांना ओळखू शकतील आणि लोक त्यांना पाठिंबा देतील.


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. पण कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या करिअरबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यावर कोणताही निर्णय जबरदस्तीने लादू नका, अन्यथा त्याचा परिणाम वाईट होईल, यामुळे तुमच्यात आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जे व्यवसायात एखाद्यासोबत भागीदारी करण्याचा विचार करत होते, त्यांनी काही काळ थांबलेलंच चांगलं राीहल, अन्यथा त्यांचा व्यावसायिक जोडीदार त्यांचा विश्वासघात करू शकेल.


कार्यक्षेत्रातील कोणताही निर्णय तुमच्या हिताचा असू शकतो, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. परंतु विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणींमुळे त्यांच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत, ज्यामुळे त्यांच्या परीक्षेच्या निकालावरही परिणाम होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, त्यांन लेखनावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल.


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संपत्तीशी संबंधित कोणत्याही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा असेल. जर तुमच्या काही विशेष कामांमध्ये बराच काळ अडथळे येत असतील तर ते आज दूर होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या काही जुन्या चुकांचा देखील पश्चाताप होईल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांची माफी देखील मागू शकता. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते.


तुम्‍ही तुमच्‍या मित्रांसोबत मजामस्‍तीमध्‍ये काही वेळ घालवाल आणि या वेळी काही मुद्द्यावरून वादही होऊ शकतात. काही विषयांबाबतचा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात राहील, पण तो दूर करण्यासाठी त्यांना शिक्षकांशी चर्चा करावी लागेल, तरच तो दूर होईल. तुम्ही कोणतेही काम विचारपूर्वक करा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल.


कन्या (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नुकसानदायक असणार आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहाल, ज्यामुळे तुमच्या वागणुकीवरही त्याचा परिणाम होईल आणि तुम्ही लोकांशी उद्धटपणे बोलाल, ज्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. कुटुंबात, तुम्ही तुमच्या पालकांना दिलेलं कोणतंही वचन तुम्हाला वेळेवर पूर्ण करावं लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ राहील, परंतु जर तुमच्या मुलाच्या करिअरची चिंता असेल तर ती चिंता दूर होऊ शकते.


मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत, तुम्हाला डोळे आणि कान उघडे ठेवून निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा तुमच्याकडून मोठी चूक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कोणतेही काम सोपवले असल्यास ते इतर कोणावरही सोपवू नका, अन्यथा त्यात झालेल्या चुकीमुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला पैसे उधार दिले असतील, तर यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कोणालाही कर्ज देणं, उसने पैसे देणं टाळा.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. ज्यांना काही नवीन काम सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल, बाहेर गेल्यास तुमच्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा. तुम्ही काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असाल, तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, अन्यथा ते चुकीच्या संगतीकडे वळू शकतात.


तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी पार्टीसाठी जाऊ शकता, परंतु तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती ऐकू आली तर ती लगेच पुढे पसरवू नका. तुमचे काही विरोधक तुमचे मित्र बनू शकतात, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तरीही तुम्ही त्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणार्‍या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांन त्यांच्या मेहनतीत कोणतीही कसर सोडू नये.


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना बनवण्याचा दिवस असेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल, परंतु तुमच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. परंतु त्याच वेळी तुम्हाला खर्च नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुमचा जोडीदार तुमच्याशी पैशाशी संबंधित कोणत्याही योजनेबद्दल बोलू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला त्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कोणत्याही विषयावर वाद सुरू असेल तर ते आज सोडवले जातील.


तुमची कोणतीही स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणावर देखील चर्चा करू शकता, ज्यामध्ये तुम्ही चांगले पैसे खर्च कराल. आज तुमच्या मुलांना काही काम पूर्ण करायला सांगा आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला काही टेन्शन येत असेल तर तेही दूर होईल.


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मान वाढवणारा असेल, जे राजकारणात काम करत आहेत, त्यांना मोठं पद मिळू शकतं आणि काही राजकारण्यांना भेटण्याची संधी देखील मिळेल, ज्यांच्यासोबत ते त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवू शकतात, चर्चा करू शकतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या कारस्थानांना बळी पडणं टाळावं लागेल, अन्यथा ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केलं तर त्यातून तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळेल. तुमचा एखादा मित्र तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावू शकतो.


तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची कोणतीही गोष्ट लोकांना आवडणार नाही, त्यामुळे ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परंतु तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामावर जास्त लक्ष द्याल, जे तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं.


मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही समस्या घेऊन येणार आहे. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल केले तर तुमच्यासाठी नवीन समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जर तुम्ही सहलीला जाण्याचं ठरवलं असेल, तर तुम्हाला गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवावी लागेल, अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या काही कामांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या भावांशी किंवा बहिणीशी बोलू शकता.


तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य आणि वेळ मिळेल. तुम्ही तुमच्या समस्या स्वतःकडे ठेवू शकता, पण वेळ पडल्यास तुम्ही त्या तुमच्या पालकांसोबत शेअर करू शकता. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून काही निराशाजनक माहिती ऐकू येईल.


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आदराचा असेल. कौटुंबिक सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वातावरण प्रसन्न राहील आणि काही शुभ कार्यक्रमाचं आयोजन करता येईल. तुम्ही कार्यालयात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांना पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहित करा. स्पर्धेची भावना तुमच्या मनात कायम राहील. 


विद्यार्थी लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात. जर तुम्हाला इतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. काहीतरी नवीन करू पाहण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या भावंडांसोबत सुरू असलेले मतभेदही दूर होतील आणि तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येईल, ज्याला भेटून तुम्हाला आनंद होईल.


मीन (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. भाऊ-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली तर त्याचा तुमच्या भविष्यावरही परिणाम होईल, त्यामुळे काळजीपूर्वक विचार करा आणि पुढे जा. जर तुम्ही आधी एखाद्या सहकाऱ्याकडून पैसे घेतले असतील, तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.


तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांची मनं जिंकाल. कोणत्याही वादापासून दूर राहिल्यास तुमच्या हिताचं ठरेल, अन्यथा तुम्ही मध्यस्थी केल्यास दुसऱ्याचं भांडण तुमच्या गळ्यात पडू शकतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या