Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 3545 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 688 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात 3275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 55 लोकांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 688
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 688 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 3549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 51 हजार 248 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 27 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 2 रुग्णांनी प्राण गमावला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 4 लाख 65 हजार 918 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत 189 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 189 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात 16 लाख 59 हजार 843 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 189 कोटी 81 लाख 52 हजार 843 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Deaths : कोरोनामुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणामुळे रिपोर्टवर उपस्थित होतायत प्रश्न
- WHO On Covid Death: कोरोनामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यावर केंद्र सरकारचा आक्षेप
- Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
- Kedarnath : आजपासून केदारनाथ मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी