Asian Games 2018 जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टर नेमबाजीत भारताच्या 16 वर्षांच्या सौरभ चौधरीने सुवर्णवेध घेतला. तिसऱ्या दिवसाचं पहिलं तर भारताच्या खात्यातील हे तिसरं सुवर्णपदक आहे.
दुसरीकडे आणखी एक नेमबाज अभिषेक वर्मानेही कांस्यपदक पटकावलं आहे. 16 वर्षीय सौरभने विक्रमी कामगिरी करत 240.7 गुण मिळवले. तर अभिषेकने 219-3 गुणांसह तिसरा नंबर मिळवला. सौरभ चौधरी उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवाशी आहे.
दुसऱ्या दिवशीची पदकं
सोमवारी भारताने 1 सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली. भारताची पैलवान विनेश फोगाटनं जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला. एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला पैलवान ठरली.
तर नेमबाज दीपक आणि लक्ष्य यांनी भारताला रौप्य पदकं मिळवून दिली.
पहिलं सुवर्ण
पैलवान बजरंग पुनियानं जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. बजरंगनं 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानं अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडून काढलं.
संंबंधित बातम्या
आशियाई स्पर्धा : 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला 'कांस्य'
एशियाड : पात्रता फेरीतच पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का
'बजरंगा'ची कमाल, एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्ण
आशियाई स्पर्धा : 10 मिटर एअर रायफल शुटींगमध्ये भारताचा 'रौप्य'वेध
आशियाई स्पर्धा : कबड्डीत भारताला मोठा धक्का, द. कोरियाकडून पराभव
एशियाडमध्ये महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण