रांची : मदतीसाठी बोलावलेल्या 11 जणांनीच दोघा अल्पवयीन तरुणींवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंडमधील लोहरदागा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. स्कूटर बंद पडल्यामुळे दोघी जणींनी आपल्या मित्राकडे मदत मागितली होती.
16 ऑगस्टच्या रात्री 11 जणांनी आपल्यावर गँगरेप केला, असा आरोप दोन अल्पवयीन तरुणींनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी 18 ते 28 वर्षे वयोगटातील 11 आरोपींची धरपकड केली.
दोघी तरुणी रात्रीच्या वेळी स्कूटरवरुन हिरही हरा टोली गावात जात होत्या. मात्र रेल्वे पुलाजवळ त्यांची गाडी बंद पडली. स्कूटर सुरु करता न आल्यामुळे एकीने आपल्या मित्राला फोन करुन मदत मागितली. मित्राने आपल्या 11 मित्रांनी दोघींच्या मदतीसाठी पाठवलं.
11 जणांनी मुलींना उचलून निर्जनस्थळी नेलं आणि एकामागून एक त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांच्याकडील मोबाईल फोनही आरोपींनी हिसकावून घेतले होते. हे फोन एका आरोपीच्या घरातून हस्तगत करण्यात आले आहेत.
मदतीसाठी बोलावलेल्या 11 जणांचा अल्पवयीन तरुणींवर गँगरेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2018 09:49 AM (IST)
स्कूटर बंद पडल्यामुळे दोघी जणींनी आपल्या मित्राला फोन करुन मदत मागितली, मात्र त्याने मदतीसाठी पाठवलेल्या 11 जणांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -