जकार्ता: भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दीविज शरण या जोडीने 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहावं सुवर्णपदक मिळवून दिलं. पुरेष दुहेरीत रोहन-दीविज जोडीने कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येवसेव या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं.
टेनिसमध्ये मिळालेलं हे दुसरं पदक आहे. गुरुवारी महिला एकेरीत अंकिता रैनाने कांस्यपदक पटकावलं होतं.
कॉड्रापल स्कल्समध्ये सुवर्णपदक
भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार जणांच्या संघामध्ये महाराष्ट्रातील तळेगावच्या दत्तू भोकनळचा समावेश आहे.
यंदाच्या एशियाड गेम्समधील हे भारताचं पाचवं सुवर्णपदक ठरलं. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांनी पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स या रोईंग प्रकारात भारताची मान अभिमानाने उंचावली. या संघाने 6.17.13 मिनिटांची वेळ नोंदवली.
शूटिंगमध्ये हिना सिद्धूला कांस्य
भारताची अनुभवी नेमबाज हिना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिनाला यावेळी सुवर्णभेद करता आला नाही. फायनलमध्ये तिला 219.2 गुण मिळाले. त्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर राहिली.
दुसरीकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या 15 वर्षीय मनू भाकेरलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. मनू 176.2 अंकांसह पाचव्या स्थानावर राहिली.
18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 23 पदकं मिळाली आहेत. यामध्ये 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत 7 व्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या
Asian Games 2018 : पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्ये सुवर्ण
Asian Games Live: खात्री होती, रोहन बोपण्णा-दीविज शरण गोल्ड मिळवणारच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2018 12:40 PM (IST)
Asian Games Live: टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दीविज शरण या जोडीने 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सहावं सुवर्णपदक मिळवून दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -